Wednesday, May 13

Tag: ‘Chullu Bhar Pani Mein Mumbai Ko Duba Diya’

पहिल्याच पावसात महाभ्रष्ट युती सरकारचे पितळ उघडे पडले; ‘चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया’- नाना पटोले -NNL

पहिल्याच पावसात महाभ्रष्ट युती सरकारचे पितळ उघडे पडले; ‘चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया’- नाना पटोले -NNL

Blog
मुंबई| मुंबई व उपनगरातील परिस्थिती पहिल्याच पावसाने अत्यंत भयावह झाली आहे. मुंबई व उपनगरातील अनेक भाग पाण्याने तुडुंब भरले, रेल्वे व रस्ते वाहतूक ठप्प होऊन मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. महानगरपालिका व रेल्वे प्रशासन यांच्यात कसलाही समन्वय नाही तर दुसरीकडे भ्रष्टाचारामुळे मुंबईकरांना शिंदे सरकारच्या पापाची फळे भोगावी लागत आहे. एकाच पावसात देशाची आर्थिक राजधानी पाण्याखाली जाते हे अत्यंत गंभीर आहे. पावसाने शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारचे पितळ उघडे पाडले असून महाभ्रष्टयुती सरकारने, चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया, असा घणघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महायुती सरकारच्या कारभाराची पोलखोल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, मुंबई महानगर पालिकेचे कारभारी स्वतः मुख्यमंत्री आहेत पण चुकीच्या व्यक्तीच्या हातात राज्याची सुत्र...
error: Content is protected !!