Fajja of Har Ghar Tiranga Abhiyan Rally : गटशिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या हर घर तिरंगा अभियान रॅलीचा फज्जा – NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| येथील गटशिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या हर घर तिरंगा अभियान रॅलीचा फज्जा उडाला असून, शहरातील शाळांच्या विद्यार्थ्यांना रॅली काढण्यासाठी बोलाऊन साधा खाऊ देखील वाटप करण्याची तसदी शिक्षण विभागाने घेतली नसल्याने पालक वर्गातून कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे.
हिमायतनगर येथील शिक्षण विभागाच्या वतीने शहरातील सर्व शासकीय निमशासकीय शाळांना शासन निर्णयाप्रमाणे हरघर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्याकरिता वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी सकाळी 9.00 वाजता हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंगल कार्यालयात तिरंगा रॅली काढण्यात येणार असल्याची सूचना ऐनवेळी देण्यात आली. तरीदेखील सूचनेचे पालन करून शहरातल्या अनेक शाळांच्या आपल्या शेकडो विद्यार्थी विद्यार्थ्यांर्थीना घेऊन उपस्थिती दर्शविली होती. परंतु या ठिकाण...
