Decorated with tricolor on dams : सजली धरणे, इमारती आणि घराघरावर तिरंगा -NNL
नांदेड| केंद्र व राज्य शासनाच्या “हर घर तिरंगा” अभियानाला नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. शहराच्या छतावर तिरंग्याचे राज्य तर वाहने, इमारती, धरणे, प्रकल्प, सभागृह सगळ्यांच्या शिरपेचात तिरंग्याने गेली तीन दिवस आपले स्थान निश्चित केले होते.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “हर घर तिरंगा अभियान” घराघरात मनामनात राबविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये प्रत्येक घरावर या काळात तिरंगा अभिमानाने फडकत होता. ध्वजसंहितेमध्ये शिथिलता आणल्यानंतर अनेक घरांमध्ये, कार्यालयामध्ये तिरंग्याच्या 3 रंगांमध्ये सजावट करण्यात आली.
15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुख्य समारोहामध्ये प्रवेशद्वारावरील भव्य रांगोळी लक्ष वेधून घेत होती. तर जिल्हाधिकारी कार्यालयाला गेल्या 2 दिवसांपासून तिरंगी प्रकाशझोताने सजविण्यात आले होते. रात्री या...
