Brutal murder ; वाका शिवारात अज्ञात मारेकऱ्यांकडून एका वृद्ध शेतकऱ्याचा निघृण खून – NNL
उस्माननगर, माणिक भिसे l उस्माननगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वाका (ता. लोहा ) शिवारात अज्ञात मारेकऱ्यांकडून एका शेतकऱ्याची धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना दिनांक चार डिसेंबर बुधवारी पहाटे पाचच्या दरम्यान घडली. दरम्यान या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक व अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळास भेट देऊन तपासाच्या सूचना करण्यात आल्या असून तपासकामी वेगवेगळी दोन पथके रवाना झाली आहेत .अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध उस्माननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
उस्माननगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे वाका येथील पशुपालक अल्पभूधारक शेतकरी किशन हरी खोसे (वय 65 ) हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतआखाडयाकडे दूध काढण्यासाठी हातात स्टीलचा कॅन घेऊन पहाटे पाच वाजता घरून जात होते .याच दरम्यान गावापासून काही अंतरावर अज्ञात मारेकर्यांनी पाठीमागून त्यांच्या मानेवर धारदार शस्...
