Saturday, June 27

Tag: begin hunger strike to death

hunger strike : हिमायतनगरच्या वार्ड क्रमांक 16 मधील समस्याग्रस्त नागरिकांचे आमरण उपोषण सुरु

hunger strike : हिमायतनगरच्या वार्ड क्रमांक 16 मधील समस्याग्रस्त नागरिकांचे आमरण उपोषण सुरु

नांदेड, व्हिडीओ, सोशल वर्क
हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक 16 मध्ये कार्लेकर हॉटेल जवळील नाल्याचे बांधकाम तसेच प्रभागातील रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. परिसरात पावसाचे व नाल्याचे पाणी शिरणार नाही याची कायमस्वरूपी सोय करावी. या मागणीसाठी स्थानिक युवकांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. मागील तीन महिन्यांपासून नागरिकांकडून वारंवार तक्रारी व निवेदनं दिली जात असूनही नगरपंचायती कडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. थोडा पाऊस झाला तरी परिसरात पाणी साचून ते थेट घरात घुसते. त्यामुळे घरगुती साहित्याचे नुकसान होऊन नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागतात, अशी माहिती समोर आली आहे. अतिवृष्टीच्या काळात खासदार नागेश पाटील व नगराध्यक्ष अब्दुल अखिल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या...
error: Content is protected !!