Friday, May 15

Tag: /- Author:- Dharmabhushan Adv.Dilip Thakur

अमरनाथ गुहेतून भाग -२ /- लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

अमरनाथ गुहेतून भाग -२ /- लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

लेख, नांदेड
आज निघण्याचा दिवस. सकाळी पाच वाजता जाग आली. सोबत घ्यायचे सामान परत एकदा चेक करून घेतले. सर्वांची रेल्वे तिकिटे, यात्रा परची प्रवास सुरू होण्यापूर्वीच पूर्वी वाटप करायचो. पण एकदा एका सहा जणांच्या कुटुंबाने नेमकी त्यांची यात्रा परची घरी विसरले होते. त्यामुळे त्यांना दर्शनाला नेताना अक्षरशः देव आठवले होते. तेव्हापासून मी तिकिटे आणि यात्रा परची माझ्याजवळ ठेवत असतो. सकाळी प्रात्यविधी आटोपून मॉर्निंग वॉक केला. अपेक्षाप्रमाणे इतर कोणीही यात्रेकरू आले नव्हते. सकाळी नऊ वाजता घरची पूजा करून वडिलांचा आशीर्वाद घेऊन निघालो. घराच्या बाजूला असलेल्या सोन्या मारुती मंदिर व सोमेश कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिराचे दर्शन घेतले. समर्थाकडे साकडे घातले की,आमची यात्रा नेहमीप्रमाणे सुखरूप पार पडू दे. दरवर्षी यात्रा संपल्यानंतर मावंद्याचा महाप्रसाद स्वामी समर्थ मंदिरात देत असतो. त्यामुळे महाप्रसादासाठी शनिवार दि.३ ऑगस...
error: Content is protected !!