Marathi Journalists Association ; 1 फेब्रुवारीच्या सेलू येथील मेळाव्यास उपस्थित रहा मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन
नांदेड l मराठी पत्रकार परिषद मुंबई, परभणी जिल्हा मराठी पत्रकारसंघ व सेलू तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित आदर्श जिल्हा व तालुका पुरस्कार वितरण तसेच पत्रकार मेळावा दि. 1 फेब्रुवारी रोजी परभणी जिल्हयातील सेलू येथे आयोजित केला आहे. या मेळाव्यास नांदेड जिल्हयातील पत्रकारांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
सेलू येथील साई मंगलकार्यालयात दि.1 फेब्रुवारी रोजी सदरील कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख हे राहणार असून या कार्यकमासाठी परभणी जिल्हयाच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर व सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,कार्याध्यक्ष शिवराज काटकर.
सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शे...
