Kha. Ashokrao Chavan : खा. अशोकराव चव्हाण यांची पत्रकार परिषद : अतिवृष्टी मदतपॅकेज आणि निवडणूक तयारीबाबत महत्त्वाची माहिती
नांदेड| अतिवृष्टी व पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या विशेष मदतपॅकेजसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील भाजपा तयारीच्या अनुषंगाने खासदार अशोकराव चव्हाण यांनी महत्वपूर्ण माहिती पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने तब्बल ३२ हजार कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजला मंजुरी दिली. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेले हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मदतपॅकेज असल्याचे त्यांनी नमूद केले.
✅ पीकनिहाय मिळणारी मदत
कोरडवाहू पिके – ₹8,500 प्रति हेक्टर (३ हेक्टरपर्यंत)
बागायती पिके – ₹17,000 प्रति हेक्टर (३ हेक्टरपर्यंत)
बहुवार्षिक पिके – ₹22,500 प्रति हेक्टर (३ हेक्टरपर्यंत)
रब्बी हंगामासाठी खत-बीज मदत – ₹10,000 प्रति हेक्टर (३ हेक्टरपर्यंत)
यामुळे एखाद्या शेतकऱ्याला किमान ₹18,500 प्रति हेक्टर इतकी मदत मिळणा...
