Dr. Mirza Baig ; नावामनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अतिरिक्त सहाय्यक आयुक्त डॉ मिर्झा बेग यांनी पदभार स्वीकारताच सुसूत्रता – NNL
नवीन नांदेड | सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे अतिरिक्त सहाय्यक आयुक्त पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. मिर्झा बेग यांनी कार्यालयीन कामात सुसूत्रता आणुन प्रलंबित असलेल्या अनेक विभागातील संचिका निकाली काढुन दैनंदिन मालमत्ता व पाणीपटी वसुली साठी करनिरीक्षक यांच्या नियोजन करून मालमत्ता धारक यांच्या कडे वसुली साठी पाठवुन मालमत्ता करात वसुली मध्ये वाढ केली असून स्वच्छतेसाठी पुढाकार घेऊन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मुख्य रस्त्यावर अंतर्गत रस्त्यांवरील केरकचरा पाहणी करून संबंधित विभागाच्या स्वच्छता निरीक्षक यांना दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या दहा दिवसांपूर्वी मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी सहाय्यक आयुक्त डॉ.मिर्झा फरतुल्ला बेग यांची अतिरिक्त सहाय्यक आयुक्त म्हणून नेमणूक केली होती, प्रारंभी प्रलंबित असलेल्या कामांचा आढावा, मालमत्ता व नळपटी वसुली यांच्या आढावा घेऊन विवि...
