Himayatnagar city and taluk heavy rain : प्रचंड विजांच्या कडकडाटात झालेल्या मुसळधार पावसाने हिमायतनगर शहर व तालुक्याला झोडपून काढले -NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहर व तालुका परिसरात परतीच्या पावसाने प्रचंड विजांच्या कडकडाटात बुधवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावली आहे. तब्बल दीड तासाहून अधिक वेळ चाललेल्या पावसामुळे शहरातील रस्ते पुराच्या पाण्याने भरून वाहत होते. विजांचा कडकडाट एवढा होता की शहर हादरू लागले असल्याचा भास नागरिकांना झाल्याने अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एकूणच पावसाने जाणवू लागलेल्या उकडयांपासून दिलासा मिळाला असला तरी शेतीत काढणीला आलेले सोयाबीनमध्ये पाणीच पाणी जमा झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या दुसऱ्या मुसळधार पावसामुळे हाताशी आलेले सोयाबीन गेल्यात जमा झाल्याने शेतकरी पूर्णतः कोलमडून गेला आहे. शासनाने तातडीने शेतकऱ्यांना पहिल्यांदा आणि आता दुसऱ्यांदा झालेल्या नुकसानीचा मोबदला म्हणून हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.
हिम...
