क्राईमनांदेड

Mukhed Nagar Panchayat : मुखेड नगरपंचातीने कर चुकविणाऱ्या दोन पेट्रोलपंपाला केलं सील

नांदेड/मुखेड| नांदेड जिल्ह्यातील मुखेड नगर परिषदचे प्रभारी मुख्याधिकारी राजेश जाधव यांच्या लेखी आदेशानुसार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता नगरपंचायत हद्दीतील बाबासाई पेट्रोल पंप व शिवप्रसाद पेट्रोल पंपाने नगर परिषदेची मालमत्ता कर न भरल्याचा कातणावरून दोन्ही पेट्रोल पंप कर वसुली पथकाने सीलबंद केले आहे. नगर परिषदेच्या कार्यकाळात पहिल्यांदाच पेट्रोल पंप सीलबंद केल्याने या धाडसी कारवाईची चर्चा होत आहे.

मुखेड नगर परिषदेच्या हद्दीत एकूण तीन पेट्रोल पंप चालविले जात आहेत. मागील अनेक वर्षापासून मालमत्ता क्रमांक ३३६० बाबासाई पेट्रोल पंप यांनी २०२५ मार्च अखेर घरपट्टी कराबद्दल येणे असलेली अधिनियम उपविधी क्रमांक १५२ नुसार रुपये ११ लाख ४३ हजार ५०६ व मालमत्ता क्रमांक ३३६२ शिवप्रसाद पेट्रोल पंपचालकाने ८ लाख ९३ हजार, २२८ रुपये रक्कम भरण्याची नोटीस बजावली होती. नोटीस देऊन १५ दिवसाचा कालावधी लोटला असताना पेट्रोल पापं चालकाने कर भरला नाही. त्यामुळे ५ फेब्रुवारी रोजी सकाळी कर वसुली पथकाने ज्योतीराम जाधव लेखापाल, लक्ष्मण गिरी कर निर्धारक यांनी दोन्ही पेट्रोल पंप सील केले आहेत.

कर वसुली पथकात कार्यालयीन अधीक्षक ज्ञानदेव गुट्टे, जालिंदर कड्डू, किरण श्रीमनवार, अश्विनी बैस, मार्तड वंजे, भारत गजलवाड, बलभीम शेंडगे, ईश्वर फुलवळकर, शिवशंकर कुच्चेवाड, रफिक बागवान, अमिर शेख, सचिन अंदेलवाड, रमेश कांबळे, गौतम बनसोडे,हाफिज सय्यद, राजेश्वर ताटीपामल, सचिन सोनकांबळे, पांडुरंग जकाते, अभिजित जोशी, तिरुपती पाटील, पृथ्वी चौहाण, गोविंद बनसोडे आदी सहभागी होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button