Mukhed Nagar Panchayat : मुखेड नगरपंचातीने कर चुकविणाऱ्या दोन पेट्रोलपंपाला केलं सील
नांदेड/मुखेड| नांदेड जिल्ह्यातील मुखेड नगर परिषदचे प्रभारी मुख्याधिकारी राजेश जाधव यांच्या लेखी आदेशानुसार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता नगरपंचायत हद्दीतील बाबासाई पेट्रोल पंप व शिवप्रसाद पेट्रोल पंपाने नगर परिषदेची मालमत्ता कर न भरल्याचा कातणावरून दोन्ही पेट्रोल पंप कर वसुली पथकाने सीलबंद केले आहे. नगर परिषदेच्या कार्यकाळात पहिल्यांदाच पेट्रोल पंप सीलबंद केल्याने या धाडसी कारवाईची चर्चा होत आहे.
मुखेड नगर परिषदेच्या हद्दीत एकूण तीन पेट्रोल पंप चालविले जात आहेत. मागील अनेक वर्षापासून मालमत्ता क्रमांक ३३६० बाबासाई पेट्रोल पंप यांनी २०२५ मार्च अखेर घरपट्टी कराबद्दल येणे असलेली अधिनियम उपविधी क्रमांक १५२ नुसार रुपये ११ लाख ४३ हजार ५०६ व मालमत्ता क्रमांक ३३६२ शिवप्रसाद पेट्रोल पंपचालकाने ८ लाख ९३ हजार, २२८ रुपये रक्कम भरण्याची नोटीस बजावली होती. नोटीस देऊन १५ दिवसाचा कालावधी लोटला असताना...
