Divisional Commissioner Dilip Gawde ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना छत्रपती संभाजीनगर विभागात 24 लाख 39 हजार 504 अर्जांना मंजूरी – विभागीय आयुक्त दिलीप गावडे – NNL
छत्रपती संभाजीनगर| महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागात 26 लाख 24 हजार 461 अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 24 लाख 39 हजार 504 अर्जांना मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आदींसह विविध योजनांच्या माहितीबाबत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपायुक्त जगदिश मिनियार, उपायुक्त स...
