MSIDC launches : MSIDC द्वारे महाराष्ट्रतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटच्या कामांसाठी ३७,००० कोटी रुपयांचा प्रकल्प सुरु
मुंबई| राज्य सरकारचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ६,००० किलोमीटरपेक्षा जास्त रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी ३७,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुधारणा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
"राज्य सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित केला असून, यामध्ये राज्य महामार्ग आणि उच्च वाहतूक असलेल्या ग्रामीण रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या रस्त्यांचा विकास आर्थिक वृद्धी आणि जलद वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे," असे MSIDC चे व्यवस्थापकीय संचालक श्री ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.
अ.क्र.
प्रदेश
जिल्हा
लांबी
(कि.मी.)
प्रकल्प किंमत
(रु. कोटी)
1
नाशिक
नाशिक, अहिल्यानगर
517.92
...
