नांदेड। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, नांदेड तसेच सकल मराठा समाज महाराष्ट्र यांच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला असून सरकारने त्वरित दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिं 12 जून रोजी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हा नांदेड यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे निवेदन देऊन करण्यात आला आहे.


मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे मागील ८ जून पासून अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले आहेत .त्यांच्या या सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी बाबतची दखल शासनाने न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे . निवेदनावर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सदा पाटील पुयड ,मंगेश कदम, तिरुपती पाटील भगनुरे, रामदास कदम, निरंजन कदम, विशाल गायकवाड, शिवा शिंदे, शंकर पानपट्टे, विष्णू पुयड, नागेश कदम व विकास देठवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

