नांदेड| मॅटस् प्रा. लि. च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक स्तरावरील ऑनलाईन अबॅकस स्पर्धेत नांदेड येथील रुद्विक राहुल निळेकर दुसरा आला असून त्याला वर्ल्ड चॅम्पियन चा बहुमान मिळाला आहे.

मॅटस् प्रा. लि. च्या वतीने घेण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियन सिझन -२ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून; या स्पर्धेत १६ देशातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या मध्ये के.बी. अबॅकस च्या ४४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.सदर स्पर्धा ही ऑनलाईन पद्धितीने घेण्यात आली होती तर १०० प्रश्नासाठी ३ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. यात रुद्विक निळेकर या विद्यार्थ्याने ३ मिनटात सर्व प्रश्न सोडवून जागतिक स्तरावर दुसरा क्रमांक पटकावला आहे.

मेंटल अरीथमॅटिक अँड अबॅकस व ऑल इंडिया टॅलेंट सर्च प्रायव्हेट लिमिटेड ही जागतिक स्तरावरील संस्था मानसिक अंकगणित आणि अबॅकस च्या कलेचा प्रचार प्रसार करण्यासाठी काम करते या संस्थेमार्फत यावर्षी १५ जून रोजी ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती.


या स्पर्धेत सर्वात कमी वयाचे सहभागी असलेले विद्यार्थी अनुक्रमे कु.युवांश्री ढवळे (३ वर्षे ), मयंक शिंदे(६ वर्षे ),तनुश्री पानपट्टे(५.५ वर्षे) , श्रेयंश कवळे (६ वर्षे ), अंकुर कोलते (६ वर्षे) या विद्यार्थ्यांसह इतर ४४ विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ के. बी. अबॅकस चे डायरेक्टर सारनाथ सौंदडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी क्लासेसचे विद्यार्थी व त्यांचे पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


