नांदेड| कडाक्याच्या थंडीत नांदेड शहराला चंद्राकार वळसा घालून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर पसरलेली दिसून आली. डंकीन ते नावघाट दरम्यान उगवत्या सूर्याच्या कोवळ्या किरणांनी धुक्याच्या पदरातून वाट काढत नदीच्या पाण्यावर सोनेरी प्रतिबिंब उमटवले आहे.



शांत जलपृष्ठावर तरंगणारे पक्षी, धुक्यात विरघळलेली नदीकाठाची रेषा आणि लालसर-केशरी आभाळात झळकणारा सूर्य — हा निसर्गाचा देखावा क्षणभर काळ थांबवणारा आहे.


थंडीतल्या या रम्य, शांत सकाळी गोदावरीच्या कुशीत साकारलेला सूर्योदयाचा हा मनोहारी क्षण नांदेड येथील छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. छायाचित्र : विजय होकर्णे, नांदेड



