आयुष कदम या बाळाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळाला दीड लाख रुपयांचा निधी- NNL

नांदेड| निळा येथिल आयुष अंकुश कदम या बाळाला मुख्यमंत्री सहायता निधीतून दीड लाख रुपयांचा निधी मिळालाअसून आ. बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

नांदेड तालुक्यातील मौजे.निळा ता.जि.नांदेड येथील रहिवासी अंकुश कदम यांचे आयुष अंकुश कदम हे लहान बाळ हैदराबाद येथील किम्स रुग्णालय या रुग्णालयामध्ये किडनीच्या आजाराचे उपचार घेत होते. त्यांच्या उपचाराचा खर्च आवकाच्या बाहेर होत असताना त्याच्या गावातील गावकऱ्यांनी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून देण्याची मागणी केली. आमदार कल्याणकर यांनी त्वरित मुख्यमंत्री सहायता निधी करिता लागणारे सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे सांगितले.

अंकुश कदम यांच्या नातेवाईकांनी सर्व कागदपत्रे जमवून आमदार कल्याणकर यांच्या कार्यालयाकडे सुपूर्द केली. व आमदार कल्याणकर यांनी स्वतः संबंधित सहायता निधीची फाईल नांदेडहून मुंबईला घेऊन जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे विशेष बाब म्हणून मदत मिळवून देण्याची विनंती केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणकर यांची विनंती मान्य करून मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे सदरील फाईल विशेष बाब म्हणून तात्काळ मंजुरी करून देण्याचे सांगितले. याआधी चे सरकार हे दुसऱ्या राज्यातील हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी करिता मंजुरी देत नव्हते. त्यामुळे मदत मिळते की नाही याची धाकधूक रुग्णाच्या नातेवाईकांना होती.

पण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आमदार कल्याणकर यांना शब्द दिल्यानुसार प्रथमच हैदराबाद येथील किम्स रुग्णालय मध्ये सुद्धा रुग्ण आयुष अंकुश कदम ह्याला अक्षरी दीड लक्ष रुपये(150000) मुख्यमंत्री सहायता निधी मधून मंजूर करून दिले व त्याला उपचाराकरिता नवसंजीवनी दिली. आयुष च्या आई-वडिलांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, नांदेड उत्तर चे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर यांचे आभार मानले. मुख्यमंत्री सहायता निधी मधून बाहेरील राज्यातील रुग्णालयामध्ये मदत मिळवून देण्याचे हे मराठवाड्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण असल्याचे कदम यांनी सांगितले.

आयुषला मदत करण्यामध्ये सर्व स्तरातील लोकांची मदत मिळाली त्यामध्ये निळा गावातील गावकऱ्यांचा व नांदेड उत्तर चे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर यांचा सिंहाचा वाटा असल्याचे कदम यांनी सांगितले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी आता जास्त थांबावे लागत नसल्यामुळे व सहायता निधी मध्ये जास्तीचे आजार व रकमेची वाढ करण्यात आल्यामुळे होत असलेल्या गतिमान कामामुळे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button