नांदेड| मुक्ता साळवे बहुउद्देशिय सामाजिक संस्था,नांदेड अंतर्गत निर्मिती नर्सिंग कॉलेजमध्ये जी.एन.एम. तसेच ए.एन.एम. प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे स्वागत व शपथविधी सोहळा नुकताच पार पडला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रतिभा सिसोदिया या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून निशा लालबाजी घाटे, डॉ. वैशाली नव्हाट,सौ. दिपा भावसार यांची व्यासपिठावर उपस्थिती होती. यावेळी सर्व प्रथम फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील सेवेबद्दलची शपथ देवविण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी या अभ्यासक्रमांचे महत्त्व तसेच सेवेची महती भाषणातून सांगितली. कार्यक्रमास निर्मिती नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी.एन.एम.चे प्रणाली चेटले, स्नेहल बामणीकर, सुजाता कांबळे, शिवानी पुणेबोईनवाड, साक्षी कांबळे, पुजा मोहक्कर, भाग्यश्री भुसावळे,समिक्षा निवडंगे, नम्रता कांबळे, आनंद रावते, कामराज पांडागळे, शुभम पवार, अभिषेक मस्के, अनिकेत राठोड, सुशील सावंत, ओंकार रामतिर्थकर, शंतनू यारावाड, वैभव जोगदंड, विजय थोंन्टेवाड, अमोल धारासुरे, अफान खान खाजा खान, मंगेश बंडे, रामाप्रकाश सूर्यवंशी, किशन पिरनवाड, निशीगंधा आठवले, दिपाली वाघमारे, शितल कंधारे, गजानन दाढे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरूणा लामतुरे यांनी केले. शेवटी आभार माधव रामतीर्थकर यांनी मानले.
—- फोटो




