श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आणि इच्छक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.अशातच किनवट-माहूर विधानसभाच्या युती आणि आघाडीमधील जागा वाटप अद्याप जाहीर झालेले नसतांना माञ भाजपा पक्षातील काही अति उत्साही पदाधीकारी हि जागा आमचीच असल्याचा दावा करीत आहे तर शिंदेसेना आमचाच उमेदवार फिक्स असल्याचा दावा करीत आहे.या जागा वाटपावरून महायुतीत संघर्ष होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
किनवट-माहूर संघातील शिंदे शिवसेनेचे ता.प्रमुख सुदर्शन नाईक यांनी शिंदे सरकार व माजी खा.हेमंत पाटील यांच्या ५ वर्षाच्या विकास कामाचा संपूर्णं लेखाजोखा सोशल मिडीयावर व्हायरल करुण ‘शिंदे सरकारचं काम बोलतंय’यांचे श्रेय कोणीही घेऊ नये, असा मजकुर टाकून माध्यमावर फिरवले आहे.
हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय.इतकेच नाही तर आ.हेमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुदर्शन नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या मतदारसंघावर दावा केला असल्याची माहीती समोर येत आहे. त्यामुळे किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे.ऐवढेच नाहीतर निवडणुकीत उभं राहण्याचा सर्वांना अधिकार आहे. निवडणुकीत कोणीही उभं राहून आपली ताकद दाखवू शकतो असा इशारा आ.हेमंत पाटील यावेळी दिला आहे.
भाजप- शिंदे गटातील वाद विकोपाला
किनवट-माहूर विधानसभेमधील भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात लोकसभेच्या निवडणुकी पासून तर आ.भिमराव केराम यांनी विकास कामाचे श्रेय लादल्यावरुण मोठा वाद निर्माण झाला आहे. हा वाद आता विकोपाला पोहोचला आहे.ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत वादाला तोंड फुटलं आहे.भाजप आणि शिवसेनेत टोकाचे वाद निर्माण झाले आहेत. आता उमेदवारी वरुण शिवसेना शिंदे गट भाजपात कुरघोड्या सुरूच आहेत.
किनवट-माहूर मतदासंघ शिवसेनेचा बालेकिल्ला
शिवसेना शिंदे गटाने जिल्ह्यातील नऊ मतदार संघापैकी सात जागांवर दावा सांगतला आहे. त्यापैकी पाच जागा आम्ही जिंकूत, असा विश्वास शिवसेनेचे आ. हेमंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, हिंगोली, लातूर आणि परभणी जिल्ह्यातही शिवसेना शिंदे गटाला चांगले यश मिळेल, असा दावाही त्यांनी केला असून किनवट-माहूर मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकणार असा आत्मविश्वास आ. हेमंत पाटील यांनी दाखवला आहे.