नांदेड। लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा निवडणुक अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नांदेड पोलीसाची दमदार कामगिरी करून आचारसंहिता कालावधीत 09 कोटी 74 लाख 07 हजार 220 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे, या दमदार कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकारी यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
आगामी लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रीक निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यस्था अबाधीत राखण्यासाठी मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी अवैध व्यवसायावर कार्यवाही करणे, अजामिनपात्र वॉरंट बजावणी करणे व प्रतिबंध कारवाई तसेच इतर कारवाई करणे बाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिले होते.
नांदेड जिल्हयातील गुन्हेगारांवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे कडुन गुन्हेगारांना हद्दपारी व स्थानबध्द सारखी परिनामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे. अवैध रित्या मद्यविक्री करणाऱ्या गुन्हेगारावर देखील परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे. जामिनपात्र वॉरंट तसेच अजामिनपात्र वॉरंट मधील आरोपीतांना वॉरंट बजावणी करुन कायदेशिर कार्यवाही करण्यात आलेली आहे.
भयमुक्त वातावरणामध्ये आगामी निवडणुक पार पाण्याकरीता शस्त्र परवाना धारकाकडे असलेले अग्नीशस्त्र जमा करण्यात आले आहेत. तसेच गोपनिय माहिती काढून अवैध रित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त करण्यात आलेला आहे. दिनांक 15/10/2024 ते दिनांक 11/11/2024 या कालावधी दरम्यान खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व उदय खंडेराय, पो.नि. स्थागुशा व सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांनी केली आहे.