हिमायतनगर, दत्ता शिराणे। धोत्रा, कामारी, विरसणी, हिमायतनगर, सिरंजनी, एकंबा, कौठा तांडा, राज्य मार्ग क्र. २५९ वर किमी ६५/०० ते ६६/०० सिरंजनी ता. हिमायतनगर गावाजवळ रस्त्याची हद्द कायम करूण आरसीसीचे बांधकाम करण्यात यावे. अशी मागणी सिरंजनीच्या सरपंच सौ. मेघाताई पवन करेवाड यांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता तुंगेनवार यांना दिलेल्या निवेदनात सरपंच सौ करेवाड म्हणाल्या की, राज्य मार्ग क्र. २५९ वर किमी ६५/०० ते ६६/०० दरम्यान मौ. सिरंजनी हे गाव आहे. या ठिकाणी रोडच्या कडेने नाली नसल्याने रस्त्यावरचे पावसाचे पाणी थेट शेतात शिरत असल्याने शेतकऱ्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे.
गावा लगत हिच परिस्थिती असल्या कारणाने अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरत असल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर येत असून नागरिकांचे मोठ्याप्रमाणात हाल होत आहेत. या बाबींकडे संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष पुरवून या ठिकाणी ची हद्द कायम करूण सिसी नालीचे बांधकाम करूण होणारे नुकसान टाळून या भागातील नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी सरपंच सौ. मेघाताई पवन करेवाड यांनी केली असून अश्या स्वरूपाच्या मागणीचे निवेदन सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड यांनी उपकार्यकारी अभियंता यांना तुंगेनवार यांना दिले आहे.