लोहा| लोहा येथील श्री संत गाडगे महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने आंतर महाविद्यालय व आंतर विभागीय पातळीवर हॅन्ड बॉल स्पर्धेत मुलाच्या संघाने यश मिकविले. या महाविद्यालयाचा संघ आता आंतर विद्यापीठ पातळीवर नांदेड विद्यापीठाचे नेतृत्व करणार आहे. प्राचार्य डॉ अशोकराव गवते पाटील यांनी टीम व क्रीडा प्रशिक्षक याचे अभिनंदन केले आहे
विद्यापीठ क्रीडा विभागाच्या वतीने लातूर येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयांच्या प्रांगणावर (१६ ऑक्टोबर) रोजी आंतर महाविद्यालयीन हॅन्ड बॉल स्पर्धा पार पडली यात लोह्याच्या श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या मुलाच्या संघाने महाविद्यालयीन व विभागीय हॅण्डबॉल स्पर्धेमध्ये दुहेरी यश पटकाविले. हा संघ पुढे होणाऱ्या अंतर विद्यापीठीय स्पर्धेसाठी देखील पात्र ठरला आहे.तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा हॅन्डबॉल संघातील कु.श्वेता बालाजी गाेरपल्ले व कु.जागृती गंगाधर कदम या विद्यार्थिनी अंतर विद्यापीठीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत.
महाविद्यालयीन खेळाडूंच्या या दुहेरी यशाबद्दल म महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अशोकराव गवते यांनी खेळाडू व प्रशिक्षक याचे अभिनंदन ,केले हॅण्डबॉल संघाचे हे यश महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर टाकणारे आहे असे सांगितले. प्रभारी क्रीडा संचालक डाॅ.एस.आर मलदोडे, हॅण्डबाॅल संघप्रमुख राजू राम केंद्रे व सर्व विजयी खेळाडू याचा सत्कार करण्यात आला.
या क्रिडा स्पर्धेतील यशाकरिता श्री बि.डी. जाधव, विवेक खोडके यांनीही परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाॅ.पुरुषाेत्तम धोंडगे, उपाध्यक्ष माधवराव पेठकर, सचिव भाई. गुरुनाथराव कुरुडे, सहसचिव अॅड. मुक्तेश्वरराव धोंडगे, महाविद्यालयाचे अध्यक्ष श व्ही.जी.चव्हाण यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.