लोहा/नांदेड| लोहा तालुक्यातील सोनखेड हद्दीत अवैधरित्या रेती चोरी करून वाहतुक करीत असल्याची गुप्त माहिती मिळल्यावरून दिनांक 06 रोजी दगडगाव वाय पॉईट येथे पोलिसांनी अवैद्य रेतीची वाहतूक करणारा एक हायवा वाहनासह चालकास ताब्यात घेवुन कार्यवाही केली आहे. या कार्यवाहीमुळे रेतीचोरामध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत सवसितर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंदयावर कार्यवाही करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पांडुरंग माने, सहा. पोलीस निरीक्षक सोनखेड यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन सोनखेड हद्दीत अवैधरित्या रेती चोरी करून वाहतुक करीत आहे. अशी माहिती मिळाल्याने दिनांक 06.12.2024 रोजी 20.30 वा. दगडगाव वाय पॉईट ता.लोहा जि. नांदेड यांनी तात्काळ सदर ठिकाणी पोहचुन एक हायवा वाहन क्रमांक एम. एच.46/एएफ-8312 थांबवुन चौकशी केली असता आत मध्ये अवैध रेती पाच ब्रॉस किंमती 25,000/- रूपयाचा माल मिळुन आल्याने वाहन व चालकास ताब्यात घेवुन गु.र.क्र.220/2024 कलम 303 (2) बीएनएस अंतर्गत पांडुरंग व्यंकट माने, सपोनि नेमणुक सोनखेड पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कार्यवाहीत पोलिसांनी मारोती लक्ष्मण चव्हाण, वय 27 वर्षे, व्यवसाय चालक रा. हिराबोरी तांडा, ता. लोहा जि. नांदेड यांच्यावर कार्यवाही करून पाच ब्रॉस रेती किंमती 25,000 /- रूपये, व एक हायवा वाहन क्र. एम. एच.-46/एएफ-8312 किंमती 21,00,000/- रूपयाचा असा एकुण किंमती 21,25,000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेब नांदेड (IPS),खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड श्रीमती आश्विनी जगताप उप विभागीय पोलीस अधिकारी, कंधार यांचे मार्गदर्शनाखाली पांडुरंग माने, सपोनि, पोस्टे सोनखेड पोहेकों/विश्वनाथ हंबर्डे, पोना / सिध्दार्थ वाघमारे यांनी केली असून, अधिकारी व अंमलदार यांनी उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल वरिष्ठानी अभिनंदन केले आहे.