उस्माननगर l अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सचे संस्थापक अध्यक्ष बा,रा,वाघमारे हे समाजासाठी नि:स्वार्थी भावनेने अहोरात्र समाज कार्य करीत असून दिवंगत नेते ॲडवोकेट राम वाघमारे आणि व्ही,एन,कपाळे यांचा ते वारसा चालवत आहेत,समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे व ताट मानाने उभे राहावे,असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारोती चिवळीकर यांनी उस्माननगर ता.कंधार येथील लोकशाहीर, साहित्य सम्राट डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ वी जयंती दिनी प्रबोधन सभेत आवाहन केले.


उस्माननगर ता.कंधार येथील लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृह येथे १०५ वी जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी सर्वप्रथम साहित्य सम्राट, लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर , राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर ध्वजारोहण गावातील प्रथम महिला तथा सरपंच सौ.शोभाबाई शेषेराव काळम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आणि त्यानंतर जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारोती चिवळीकर हे होते.


यावेळी प्रमुख वक्ते व पाहुणे म्हणून भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास दादा गजभारे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पोहरे,भंते दीपरत्न,देवरावजी सोनसळे,डॉ, गणपत जिरोणेकर,देवराव पांडागळे , दत्ता पाटील घोरबांड , कमलाकर शिंदे , रूद्र संजय वारकड , विश्वाभंर मोरे ( पोलिस पाटील) , आमिनशा फकीर , आशोक पाटील काळम , अंगुलीकुमार सोनसळे , मुख्याध्यापक राहुल सोनसळे , यावेळी विचार पिठावर डॉ,बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार प्राप्त माधवराव आंबटवाड, अण्णा भाऊ साठे समाज भूषण पुरस्कार प्राप्त आर,जे,वाघमारे, गुणाजी बुचडे,शिवाजी बुचडे,डी, के,डोंपले,डॉ,मुंडकर यांच्या सह उस्माननगरचे भूमिपुत्र तथा अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स चे संस्थापक बा,रा, वाघमारे यांची विशेष उपस्थिती होती.


यावेळी उपस्थित मान्यवरांचे जयंती मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विजय भिसे यांनी केले. यावेळी अनेकांनी आपली समयोचित भाषणे झाली. प्रमुख वक्ते विलास दादा गजभारे म्हणाले की , सर्व संतांनी समानतेची वागणूक व शिकवणं दिली आहे.

त्याचे अनुकरण केले पाहिजे. सर्व समाजातील जनता एकत्र आल्याशिवाय आपल्या समाजाचा विकास होणार नाही.असे मत व्यक्त केले.याप्रसंगी पत्रकार लक्ष्मण कांबळे यांचा जयंती मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी गजभारे मार्गदर्शन करताना म्हणाले की, बोधीसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व डॉ.अण्णा भाऊ साठे यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा. मराठी भाषिकासाठी स्वातंत्र लढा स्थापन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात जो संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा उभारला गेला त्यात अण्णा भाऊ साठे यांनी लोकनाट्य , पोवाडा , आणि लोकगिताच्या माध्यमातून जनजागृती केली.
म्हणजेच अण्णा भाऊ साठे या चळवळीचे एक प्रसार माध्यम होते. त्यांचे हे मौलिक योगदान नव्या पिढीला ज्ञात होणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले. याबरोबरच बा.रा. वाघमारे यांनी चौफेर फटके बाजीतून आपल्या समाजाला दिशा देण्याचे काम आपले मनोगतातून व्यक्त केली. तसेच अनेक मान्यवर व लहान मुलांनी डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली. दुपारी तीन वाजता गावातील प्रमुख मार्गाने डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्राची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी समाजातील नागरिक, महीला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ वी जयंती दिनाचे औचित्य साधून उस्माननगर येथील सांस्कृतिक सभागृहा समोर डॉ.गणपत जिरोणकर आणि डॉ. मुंडकर यांच्या वतीने गरजू नागरिकांच्या डोळ्यांच्या रोगाचा मोफत उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.यास गरजू लाभार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.


