Maroti Chivalikar ; समाजाने बा,रा,वाघमारे यांच्या पाठीशी उभे राहावे – मारोती चिवळीकर
उस्माननगर l अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सचे संस्थापक अध्यक्ष बा,रा,वाघमारे हे समाजासाठी नि:स्वार्थी भावनेने अहोरात्र समाज कार्य करीत असून दिवंगत नेते ॲडवोकेट राम वाघमारे आणि व्ही,एन,कपाळे यांचा ते वारसा चालवत आहेत,समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे व ताट मानाने उभे राहावे,असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारोती चिवळीकर यांनी उस्माननगर ता.कंधार येथील लोकशाहीर, साहित्य सम्राट डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ वी जयंती दिनी प्रबोधन सभेत आवाहन केले.
उस्माननगर ता.कंधार येथील लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृह येथे १०५ वी जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी सर्वप्रथम साहित्य सम्राट, लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर , राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर ध्वजारोहण गावातील प्रथम महिला तथा सरपंच सौ.शोभाबाई शेषेरा...
