एक पेड माॅं के नाम सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम – NNL

0

उस्माननगर| सामाजिक वनीकरण विभाग नांदेड व परिक्षेत्र कंधार सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उस्माननगर येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात “एक पेड माॅं के नाम ” उपक्रम राबवून वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्ष लागवड ही चळवळ देशभरात मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ” एक पेड माॅं के नाम ” मोहिमाचा शुभारंभ केला व वृक्षारोपण कार्यक्रम जाहीर केला . परिक्षेत्र कंधार सामाजिक वनीकरण विभाग व वनविभागाच्या वतीने ३० सप्टेंबर दरम्यान वृक्षारोपण लागवड मोहीम राबविण्यात येत आहे. सामाजिक वनीकरण विभाग नांदेड संदीप चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी शितल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ” एक पेड माॅं के नाम ” वन महोत्सव अंतर्गत मौजे उस्माननगर येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील वृक्ष लागवडी बाबत वृक्ष दिंडी काढून वृक्षारोपण करून वन महोत्सव साजरा करण्यात आला.

शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडी बाबत माहिती सांगण्यात आली. या पावसाळ्यात एक वृक्ष आपल्या आईच्या नावावर लावण्यात यावे, ” एक पेड माॅं के नाम ” या बाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड पर्यवेक्षक राजीव आंबेकर , सोनवणे, मा . के.एन . कंधारे ( वनपरिक्षेत्र अधिकारी कंधार ), मा. एस. एन. सांगळे ( सामाजिक वनीकरण विभाग कंधार ),वनपाल कंधार डी.डी. गिते, वनरक्षक जी.एन., वनरक्षक कंधार जी.एन कपाळे, आर. मी. शिंदे, स्वामी ए.यु., बेग, राजु डोम्पले, यांच्यासह शाळेतील शिक्षक वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here