उस्माननगर l येथून जवळच असलेल्या मोजे सिद्धार्थनगर भोपळवाडी बुद्रुक तालुका लोहा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 4 ऑक्टोंबर शनिवारी 2025 रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्तीचा सोळावा वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर( सकाळी नऊ पस्तीस ) ९ :३५ वाजता कलंबर बुद्रुक येथील विद्यमान सरपंच सौ. मंगलाबाई उमाकांत सोरगे यांच्या शुभहस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण होईल.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आनंदराव पाटील शिंदे ( माजी सभापती पंचायत समिती लोहा) , नरेंद्र गायकवाड( माजी उपसभापती पंचायत समिती लोहा ) , साहेबराव पाटील काळे ( संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा) , बाबू आप्पा मुक्कनवार ( माजी पंचायत समिती सभापती लोहा ), बालाजी भैय्या परदेशी ( माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड), रावसाहेब पाटील भोपाळे (माजी सरपंच कलंबर बुद्रुक), श्रीधर गोरे ( माजी सरपंच कलंबर बुद्रुक ) , माधव मोकले ( उपसरपंच कलंबर बुद्रुक ) , तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले , सपोनि संजय निलपत्रेवार.


( पोलीस स्टेशन उस्माननगर ) , मोहन अप्पा गाजेवार ( लोहा भाजपा तालुकापाध्यक्ष) , महेश पाटील करंडे ( पोलिस पाटील कलंबर बु.) , आनंदराव पाटील घोरबांड ( कृ. उ बा. स. सचिव लोहा ) , ए. व्ही. शिंदे ( ग्रामपंचायत अधिकारी कलंबर बु) , तलाठी सुर्यवंशी , बाबुअप्पा गोरे ( अध्यक्ष म .गा. तं. मु. समिती कलंबर) , डि. के. कांबळे ( आ. प्रतापराव पाटील चिखलीकर समर्थक तथा सामाजिक कार्यकर्ते कलंबर बुद्रुक सर्कल) , मारोती पाटील घोरबांड ( संचालक समाज उन्नती शिक्षण संस्था कलंबर बु ) , विठ्ठल कांबळे ( ग्रा.सदस्य ) , पत्रकार दत्ता कांबळे , बालाजी बोईनवाड ( पो. पा. संगुचीवाडी. ) , ताटे पाटील छावा तालुकाध्यक्ष , मारोती कोटेवाड , बसपा जिल्हा उपाध्यक्ष ) , पत्रकार विठ्ठल ताटे , पत्रकार नामदेव तारू , बाळु पा. भोकरे , जिवन पा. भोपाळे , मारोती पाटील भोपाळे , यांच्या सह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.

धम्मसभे नंतर दुपारी एक वाजता गावातील प्रमुख रस्त्याने तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्रीला सांस्कृतिक कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक राजरत्न कांबळे ( कंधार ) व सुप्रसिद्ध गायिका उपा. सिमाताई प्रधान (औरंगाबाद) संभाजीनगर यांचा धम्म गिताचा दणदणीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी परिसरातील भिम अनुयायांनी व समस्त नागरिकांनी तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्तीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष उपा. विश्वनाथ कांबळे , उपाध्यक्ष उपा. प्रकाश ढवळे , सचिव उपा. संदीप कांबळे , सहसचिव उपा. प्रकाश सोनकांबळे , सल्लागार. उपा. गंगाधर हानवते , उपा. सम्रत वाघमारे , राहुल गायकवाड यांच्या सह कमेटीतील सदस समाज बांधवांनी केले आहे.

