statue of Tathagata Gautam Buddha ; भोपाळवाडी कलंबर( बु.) येथे तथागत भगवान गौतम बुद्ध मुर्तीचा सोळावा वर्धापन दिन सोहळा
उस्माननगर l येथून जवळच असलेल्या मोजे सिद्धार्थनगर भोपळवाडी बुद्रुक तालुका लोहा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 4 ऑक्टोंबर शनिवारी 2025 रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्तीचा सोळावा वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर( सकाळी नऊ पस्तीस ) ९ :३५ वाजता कलंबर बुद्रुक येथील विद्यमान सरपंच सौ. मंगलाबाई उमाकांत सोरगे यांच्या शुभहस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण होईल.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आनंदराव पाटील शिंदे ( माजी सभापती पंचायत समिती लोहा) , नरेंद्र गायकवाड( माजी उपसभापती पंचायत समिती लोहा ) , साहेबराव पाटील काळे ( संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा) , बाबू आप्पा मुक्कनवार ( माजी पंचायत समिती सभापती लोहा ), बालाजी भैय्या परदेशी ( माजी जिल्...
