उस्माननगर l लोहा तालुक्यातील पोखरभोसी येथे माळावरील महादेव मंदिर येथे श्री महादेव पिंड प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन दि.५ डिसेंबर २०२५ रोज शुक्रवार ह्या दिवशी सकाळी ०९ ते १२ पर्यंत पिंड, कलश पुजा व होम हवन होणार आहे . तर पिंड प्राणप्रतिष्ठापना सकाळी ०९ ते ११ पर्यत,कलशारोहण सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत श्री ह.भ.प. विजयानंद महाराज सुप्पेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.


ह्या कार्यक्रमात ह.भ.प.विजयानंद महाराज सुप्पेकर यांचे किर्तन १२ ते ०२ पर्यंत होणार आहे तरी भाविक भक्तानी उपस्थित राहून पिंड प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण व विजयानंद महाराज सुप्पेकर यांच्या रसाळ वाणीतून किर्तन रूपी ज्ञान अमृताचा लाभ घ्यावा व किर्तन संपल्यानंतर भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी पोखरभोसी यांनी केले आहे.




