Homeव्हिडीओजबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीस 44,895/- रुपयाचे मुद्देमालासह अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही-...

जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीस 44,895/- रुपयाचे मुद्देमालासह अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही- NNL

नांदेड। जबरी चोरीच्या गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.

दिनांक 03/07/2024 रोजी स्थागूशा चे पथकास गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, रेणुकाई हॉस्पीटल जवळ, जबरी चोरी करणारे आरोपीपैकी एकआरोपी गोवर्धनघाट, नांदेड येथे आहे अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने गोवर्धनघाट, नांदेड येथे सापळा रचुन आरोपी नामे शेख माजीद शेख उस्मान वय 20 वर्ष व्यवसाय बेकार रा. गोवर्धनघाट, नांदेड यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने व त्याचा इतर एक साथीदार यांनी मिळुन दिनांक 07/06/2024 रोजी रेणुकाई हॉस्पीटल जवळ, नांदेड येथुन एका महीलेच्या गळयातुन जबरीने गंठन चोरी केले होते असे सांगीतले.

नमुद आरोपीचे ताब्यातुन गंठनचा त्याचे हिश्याचा तुकडा व मंगळसुत्र किंमती 44,895/- रुपयेचा जप्त करण्यात आला असुन त्याचा इतर एक साथीदार यांचा शोध घेणे चालु आहे. मिळुन आलेल्या आरोपीस मुद्देमालासह पोलीस ठाणे गु.र.नं. 84/2024 कलम 392 भा द वि गुन्हयाचे पुढील तपासकामी शिवाजीनगर पोलीसांचे ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, पोउपनि / मिलींद सोनकांबळे, पोकों/बालाजी यादगीरवाड, विठ्ठल शेळके, ज्वालासिंघ बावरी, गजानन बयनवाड, विलास कदम, चालक हनुमानसिंह ठाकुर स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments