नांदेडसोशल वर्क

Shivram Lute ; महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षपदी शिवराम लुटे यांची एक मताने निवड – NNL

नवीन नांदेड l महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, १८ऑक्टोबर, २४ रोजी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे संपन्न झाली. या सभेमध्ये महासंघाच्या नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष शिवराम लुटे यांची महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून एक मताने निवड करण्यात आली आहे. सदरील निवड ही पुढील पाच वर्षासाठी आहे.

या निवडीबद्दल नांदेड दक्षिणचे आमदार माजी मोहनराव हंबर्डे व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अधिकारी फोरमचे अध्यक्ष डॉ.अशोक कदम ,कृती समितीचे सचिव हुशारसिंग साबळे ,पतसंस्थेचे अध्यक्ष गोविंद हंबर्डे, सचिव संजयसिंह ठाकूर, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा पतसंस्थेचे उपाध्यक्ष,कृती समितीचे अध्यक्ष काळबा हानवते, विद्यापीठ फंड कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तुकाराम हंबर्डे, शिवलिंग पाटील, अब्दुल बशीर,प्रमोद देशमुख, संदीप येडके,गणपत लुटे,विवेक भोसले यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी यांनी शिवराम लुटे यांचे अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button