देगलूर l मराठवाड्यात कधी नव्हे अशा भीषण ओला दुष्काळ पडला असुन या गंभीर दुष्काळात सरकार जरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत असले तरी शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभी आहे.


व राहील त्यासाठीच कुंभकर्ण झोपेचं सोंग घेणाऱ्या , गेंड्याच्या कातडीचे महा भ्रष्ट फसवणूक सरकारला जागे करण्यासाठी दि.11 आक्टोबर रोजी संभाजीनगर येथील शिवसेनेच्या वतीने हंबरडा महा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे या मोर्चात शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करावा असे आवाहन शिवसेना नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी देगलूर येथील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ पदाधिकारी आढावा व नियोजन बैठकीत बोलताना केले.


या बाबतीत अधिक माहिती अशी की शेतकरी बांधवांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान, पिक कर्ज माफी, पिक विमा आदी न्याय मागण्यासाठी संभाजीनगर येथील शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री मा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माजी विरोधी पक्षनेते मराठवाडा संपर्कप्रमुख मा श्री अंबादास दानवे साहेब , नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख मा श्री बबनराव थोरात साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.11 ऑ क्टोबर रोजी हंबरडा महामोर्चा काढण्यात येणार आहे.


या मोर्चाचे नियोजन व आढावा बैठक देगलूर सिद्धेश्वर रेस्टॉरंट सभागृहात दि.7 ऑक्टोबर रोजी शिवसेना नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख मा श्री बबनराव थोरात साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यावेळी सहसंपर्कप्रमुख मा श्री दयाल गिरी साहेब , जिल्हा संघटक मा श्री विजय मुंडकर , आदी सह देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, देगलूर शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर.

मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके, बिलोली तालुका प्रमुख शिवकुमार बामणे सगरोळीकर, जिल्हा समन्वयक विपुल पटणे, माजी जिल्हा परिषद सदस्य नागनाथ वाडेकर,बिलोली तालुका संघटक हाणमंत पाटील, देगलूर शहर प्रमुख संजय जोशी,शहर प्रमुख रवि उल्लेवार, शिवसेना उपशहरप्रमुख बाबुराव मिनकीकर उपशहरप्रमुख मष्णाजी पैलावार, युवा सेना तालुका प्रमुख तथा शिवसेना सोशल मीडिया नेटवर्क प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, शिवसेना शहर संघटक भगवान जाधव, देगलूर तालुका संघटक शांतेश्वर पाटील शेवाळकर, उपतालुकाप्रमुख मानाजी पाटील लोणे , उपतालुकाप्रमुख पुरुषोत्तम अन्सापुरे.
उपतालुकाप्रमुख व्यंकट रेड्डी आलुरे, युवा सेना तालुका समन्वयक प्रविण इनामदार, युवा सेना पदाधिकारी राहुल सोनकांबळे, युवा सेना पदाधिकारी विनोद सोनकांबळे, युवा सेना उपशहरप्रमुख गणेश चप्पलवार, विभाग प्रमुख शंकर पाटील देवकत्ते, गंगाधर पाटील, तुकाराम महाराज निवळले, गंगाधर पुंज्यपवार, सुभाष खुनेवाड अल्पसंख्याक सेना तालुका प्रमुख युसुफ भाई मिस्त्री, अल्पसंख्याक सेना शहर प्रमुख सय्यद मिर भाई , बिलोलोलीचे शिवसेना पदाधिकारी सरपंच बोडके, युवा सेना उपतालुकाप्रमुख आनंद सुर्यवंशी भुतनहिप्परगेकर आदीसह देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी युवा सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते


