Babanrao Thorat ; संकटाच्यावेळी शिवसेना शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी – संपर्कप्रमुख बबनराव थोरात
देगलूर l मराठवाड्यात कधी नव्हे अशा भीषण ओला दुष्काळ पडला असुन या गंभीर दुष्काळात सरकार जरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत असले तरी शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभी आहे.
व राहील त्यासाठीच कुंभकर्ण झोपेचं सोंग घेणाऱ्या , गेंड्याच्या कातडीचे महा भ्रष्ट फसवणूक सरकारला जागे करण्यासाठी दि.11 आक्टोबर रोजी संभाजीनगर येथील शिवसेनेच्या वतीने हंबरडा महा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे या मोर्चात शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करावा असे आवाहन शिवसेना नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी देगलूर येथील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ पदाधिकारी आढावा व नियोजन बैठकीत बोलताना केले.
या बाबतीत अधिक माहिती अशी की शेतकरी बांधवांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान, पिक कर्ज माफी, पिक विमा आदी न्याय मागण्यासाठी संभाजीनगर येथील शिवसेना पक्षप्...
