नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रामभाऊ ठाकरे यांच्या प्रचाराला मिळणार वेग


हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रामभाऊ ठाकरे आणि सर्व नगरसेवक यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ श्री परमेश्वर मंदिर मैदानात दिनांक २५ नोव्हेंबर मंगळवारी सायंकाळी ६ वाजता भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. संजय शिरसाट, शिवसेना नेत्या ज्योतीताई वाघमारे, आमदार हेमंतभाऊ पाटील तसेच आमदार बाबुराव कदम कोहळीकर, जिल्हाप्रमुख विवेक देशमूख मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे ही सभा हिमायतनगरच्या राजकीय वातावरणात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.



सभेच्या माध्यमातून विकासाच्या विविध योजना, आगामी राजकीय दिशा आणि शहरच्या विकासाच्या बाबतीत करण्यात येणाऱ्या योजनांचा जाहीरनामा सर्वसामान्य जनतेसमोर ठेवला जाणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. ही सभा हिमायतनगर नगरपंचायतीतील राजकीय समीकरणे बदलण्यास महत्त्वाची ठरू शकते अशी चर्चा सध्या रंगत आहे.

या भव्य सभेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष विजय वळसे व सर्व शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

