हिमायतनगर, अनिल मादसवार| महाराष्ट्र राज्यांचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या वाढदिवसापासून ( शिवकार्य ) शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राज्यभरात राबविण्यात येत आहे. या अभियानाला गती देण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवनीनूसार ८०% समाजकारण व २०% राजकारण अश्या प्रमाणात काम करावे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून घराघरात शिवसेना सदस्य नोंदणीचे काम वेगाने पूर्ण करावे. असे अवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) विवेक देशमुख (Shiv Sainiks should start working to deliver Shivkarya Abhiyan to every household – District Chief Vivek Deshmukh) यांनी केले.


ते हिमायतनगर येथे दिनांक ०९ रविवार आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिवकार्य अभियान तसेच शिवसेना पक्ष नोंदणी अभियानाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर माजी जि.प सदस्य संभाराव लांडगे, सुदर्शन पाटील मनूलेकर, युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसनीकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सितल भांगे, उपजिल्हाप्रमुख राजू पाटील भोयर, विकास पाटील देवसरकर, अबा वानखेडे, सिने अभिनेते विनय देशमुख, शहरप्रमुख गजानन हरडपकर आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी पुढे बोलतांना श्री देशमुख म्हणाले की, गेल्या अडिच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून एकनाथभाई शिंदे यांनी केलेले उल्लेखनीय काम जनतेनीं स्वीकारून महायुतीच्या पारड्यात जनमत टाकले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे कार्य जनतेच्या मनात घर करून आहे. आपले नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेले आहे.


आगामी काळात शिवसेना पक्षाचा विस्तार अधिक होणे गरजेचे असून, येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लक्षात घेऊन शिवसेना ही पक्षसंघटना अधिक मजबूतीने पुढे आली पाहिजे यासाठी शिवसैनिकांनी अंग झटकून कामाला लागावे. असे अवाहन ही शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष विजय वळसे पाटील यांनी केले. तर उपस्थितांचे आभार शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे यांनी मानले.

यावेळी माजी सभापती लक्ष्मण जाधव, युवासेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पुठेवाड, सुनील चव्हाण, बाबुराव काळे, विजय तावडे, साईनाथ कप्पलवाड, नागोराव गुंडेवाड, गौरव सुर्यवंशी, फेरोज कुरेशी, शेख अफरोज, श्याम पाटील, शिवाजी शिंदे, प्रदीप जाधव, दिनेश राठोड दिलीप ढोणे, सिद्धेश्वर चव्हाण, संतोष शिरगीरे, आदींसह शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.


