कंधार, सचीन मोरे l ग्रामपंचायत अधिकारी तानाजीराव घोगरे यांच्या सेवानिवृत्तीचा भावस्पर्शी कार्यक्रम उत्साहात पार पडला. सेवाभाव, प्रामाणिकता आणि विकासनिष्ठ कामामुळे ओळख निर्माण केलेल्या घोगरे यांच्या कार्याचा या सोहळ्यात भव्य सत्कार करण्यात आला. गावोगावच्या विकासाचे घोगरे हे शिल्पकार आहे असे मनोगत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन शिंदे यांनी केले.


पंचायत समिती कंधारच्या वसंतराव नाईक सभागृहात ८ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत अधिकारी तानाजीराव घोगरे यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी कृषी कोकणे उपस्थित होते. घोगरे यांच्या सर्व कुटुंबिय या कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी सचिव आदमपूरकर यांनी केले.

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृतराव शिंदे, सरचिटणीस धम्मानंद धोत्रे, कार्याध्यक्ष श्रीनिवास मगवे यांची उपस्थिती होते. संघटनेतर्फे घोगरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तालुका संघटनेचे अध्यक्ष विलास नारनाळीकर, सरचिटणीस जगदेव शिंदे, मनद अध्यक्ष एन.डी. सोनकांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. मुखेडचे कल्याणकर आणि लोहाचे अनिल पाटील यांनी विशेष उपस्थिती होते. कार्यक्रमाचे आभार तालुका कृषी अध्यक्ष विश्वनाथ केंद्रे यांनी मानले.


या कार्यक्रमाला सचिन पाटील, कृष्णा रामदिनवार, भास्कर व्यवहारे, सचिन बिराजदार, गोविंद कौशल्य, तुकाराम पोटेवार, जयवंतराव घटकार, हनुमंतराव गजले, मुंजाळ साहेब, रुंजे साहेब, अंतेश्वर इंगळे, मोहन टेंभुर्णे, सुरवसे यांच्यासह कंधार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी आणि महिला ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


