गावोगावच्या विकासाचे घोगरे हे ‘शिल्पकार’ सेवानिवृत्तीचा गौरव सोहळ्यात शिंदे यांचे प्रतिपादन
कंधार, सचीन मोरे l ग्रामपंचायत अधिकारी तानाजीराव घोगरे यांच्या सेवानिवृत्तीचा भावस्पर्शी कार्यक्रम उत्साहात पार पडला. सेवाभाव, प्रामाणिकता आणि विकासनिष्ठ कामामुळे ओळख निर्माण केलेल्या घोगरे यांच्या कार्याचा या सोहळ्यात भव्य सत्कार करण्यात आला. गावोगावच्या विकासाचे घोगरे हे शिल्पकार आहे असे मनोगत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन शिंदे यांनी केले.
पंचायत समिती कंधारच्या वसंतराव नाईक सभागृहात ८ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत अधिकारी तानाजीराव घोगरे यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी कृषी कोकणे उपस्थित होते. घोगरे यांच्या सर्व कुटुंबिय या कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी सचिव आदमपूरकर यांनी केले.
ग्रामपंचायत अधिका...
