उस्माननगर, माणिक भिसे| लोहा तालुक्यातील उमरा खांडी येथे मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन तीन मेंढपाळ यांना उमरा येथील १० ते १५ जणांनी बेदम मारहाण केली असून याबाबत उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. सदर प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
लोहा तालुक्यातील उमरा खांडी येथील वन विभागाच्या जंगलात कापसी बु येथील दहा ते बारा मेंढपाळ हे मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी उमरा तांडा येथील उतम जाधव, हनमंत पवार, राजू उतम जाधव यांच्यासह बारा जणांनी उमरा खांडी येथील मेंढपाळ यांना या ठिकाणी मेंढ्या का चारवत आहात म्हणून वाद घातला त्यानंतर उतम जाधव, हनमंत पवार यांनी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली आहे. या मारहाणीत गोविंद सिदने, मारोती गारपले यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गोविंद सिदने यांची बोटे फुटून हात मोडला आहे. तर मारोती गारपले यांच्या डोक्यात दगड मारल्याने टाके पडले आहेत.
मेंढपाळ गोविंद सिदने यांनी उस्माननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदर तक्रारी वरुन उतम जाधव, हनमंत पवार, राजू जाधव यांच्या विरोधात उस्माननगर पोलिस ठाण्यात गु . र. न. ११८ ( २) ,१८ ( १) ,११५ ( २) ३५२ ,३५१ (२) (३ ) ३ (५) बी. ई. एन.एस. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास स. पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार भारती हे करीत आहेत. या मारहाण प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी अन्यथा धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाने दिला आहे.