नांदेड| आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजातील उमेदवारांना विधानसभेत पाठवा, जोपर्यंत ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत अठरापगड जातीतीळ लोकांना न्याय मिळणार नाही. असे आवाहन ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले.


ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणूक जिंकण्याचे व्याकरण कळाले आहे. मात्र, त्यांना ओबीसी अठरापगड जातीचे अंत:करण कळाले नसल्याचे टीका ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली आहे. शरद पवारांना ओबीसी समाजातील जातीचे अंत:करण कळाले असते तर ते आतापर्यंत चार ते पाच वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते, असे देखील हाके यांनी म्हटले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजातील उमेदवारांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन देखील हाके यांनी केले आहे.


राज्यात ओबीसी समाजाचे प्रमाण 60 टक्के असून, या समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न मराठा आरक्षणाच्या माध्यमातून होत असल्याचा आरोप देखील प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला आहे. आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचे काम करत असल्याचेही हाके यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी शरद पवार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. कोणत्याही परिस्थितीत आमच्या हक्कावर कदा आणू दिली जाणार नाही. असे म्हणत हाके यांनी ओबीसी समाजाचे आरक्षण संपवणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार का? असा प्रश्न देखील ओबीसी समाजातील मतदारांना विचारला आहे. मनोज जरांगे पाटील 288 आमदार पाडणार आहेत, मग ते कोणाचे आमदार पाडणार? असा प्रश्न देखील लक्ष्मण हाके यांनी विचारला. मराठा आरक्षणाच्या नावाखाली मनोज जरांगे पाटील संपूर्ण राज्याला वेठीस धरत असल्याचा आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी केला आहे.




