Laxman Hake : आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजातील उमेदवारांना विधानसभेत पाठवा – प्रा. लक्ष्मण हाके -NNL
नांदेड| आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजातील उमेदवारांना विधानसभेत पाठवा, जोपर्यंत ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत अठरापगड जातीतीळ लोकांना न्याय मिळणार नाही. असे आवाहन ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले.
ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणूक जिंकण्याचे व्याकरण कळाले आहे. मात्र, त्यांना ओबीसी अठरापगड जातीचे अंत:करण कळाले नसल्याचे टीका ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली आहे. शरद पवारांना ओबीसी समाजातील जातीचे अंत:करण कळाले असते तर ते आतापर्यंत चार ते पाच वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते, असे देखील हाके यांनी म्हटले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजातील उमेदवारांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन देखील हाके या...
