Homeक्राईमArrested : फरारी व एन.बी.डब्लु. आरोपींना उस्माननगर पोलीसांनी केले जेरबंद

Arrested : फरारी व एन.बी.डब्लु. आरोपींना उस्माननगर पोलीसांनी केले जेरबंद

उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर पोलिस ठाण्याचे हद्दीतील फरारी आरोपी व न्यायालयाने वारंवार समन्स काढले तरी न्यायालयात वेळेवर हाजर होत नाहीत. परिणामी न्यायालय एन.बी. डब्लु. (अजामीनपात्र वॉरंट) काढण्यात येते. अशा गुन्ह्यांतील आरोपिंना ताबडतोब न्यायालयात हाजर करण्याचे आदेश वरिष्ठांनी उस्माननगर पोलीसांना देण्यात आले.

गोपनिय माहितीच्या आधारे उस्माननगर पोलीसांनी आरोपी 1) बालाजी हनुमंत जाधव, 2) मोहन बालाजी जाधव, 3) रमेश बालाजी जाधव,रा.हातनी ता.लोहा. 4) रामदास दत्तराम भरकडे, रा.नादगाव, ता.लोहा. 6) तानाजी बालाजी येडे,रा.मारतळा, 7) गंगाधर बालाजी खंडगावे रा.वर्ताळा ता.मुखेड. 8) हमिद फकिरसाब कुरेशी, 9) मकबुल रसुलसाब कुरेशी,रा.साठेनागर कंधार, 10) नागनाथ संभाराव रामशेटवाड, 11) गीतेश गंगाधर रामशेटवाड रा.हळदा या.कंधार. यांना अटक करूण न्यायालयात हाजर करण्यात आले.

हि कार्यवाही, ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटिल भोकर, श्रीमती अश्विनी जगताप उपविभाग अधिकारी कंधार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि.सजय निलपत्रेवार, ASI मगदुम, HC गंगाधर चिंचोरे, HC बलवंत कांबळे, PC तुकाराम जुन्ने, PC प्रकाश पेद्देवाड, यांनी केली. भविष्यात न्यायालयात वेळेवर हाजर न होना-या आरोपींची गय केली जानार नसल्याचे सपोनि. संजय निलपत्रेवार यांनि सांगितले. या यशस्वी कामगिरी बद्दल वरिष्ठांनी उस्माननगर पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments