Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Savitribai Phule : सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक
नांदेड लेख January 2, 2026

Savitribai Phule : सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक

NNL TeamBy NNL TeamJanuary 2, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

भारतीय समाजाच्या इतिहासात सावित्रीबाई फुले यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे व प्रेरणादायी आहे. स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि मानवतावादी मूल्ये यासाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या एक थोर समाजसुधारक, कवयित्री आणि परिवर्तनाच्या सर्वकालीन प्रतिक आहेत.ज्या काळात स्त्रीने शिकणे पाप मानले जात होते, त्या काळात त्यांनी शिक्षणाचा दिप प्रज्वलित करुन सामाजिक अज्ञानाच्या अंधाराला आव्हान दिले. स्वत:च्या आयुष्याला आकार देतानाच भारतीय स्त्री- शिक्षणाच्या पायाही त्यांनी घातला.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील हे शेतकरी होते. बालवयातच त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी झाला. ज्योतिरावांच्या परिवर्तनवादी झंझावाताला गती देणाऱ्या आदर्श पत्नी म्हणून त्या इतिहासात अमर झाल्या.  त्या काळातील रूढीप्रमाणे सावित्रीबाई अशिक्षितच होत्या; मात्र ज्योतिराव फुले यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. पतीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रथम घरीच शिक्षण घेतले आणि पुढे पुण्यात शिक्षक प्रशिक्षण पूर्ण केले.  संस्कृती, शालिनता, शिस्त व आधुनिकता याचा मिलाप म्हणजे सावित्रीबाई फुले.

१८४८ साली पुण्यात भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करून सावित्रीबाई फुले यांनी इतिहास घडवला. त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या.तो काळ स्त्री शिक्षणाच्या विरोधाचा होता. सावित्रीबाईंना शाळेत जाताना रस्त्यावरून जाताना लोक शिवीगाळ करीत, दगड-शेण फेकत; तरीही त्यांनी हार मानली नाही. त्या शाळेत जाताना नेहमी एक अतिरिक्त साडी बरोबर ठेवत, अपमान सहन करूनही त्या शिक्षणाच्या कार्यात अविरत कार्यरत राहिल्या.  त्या शिक्षण घेणाऱ्या, शिक्षण देणाऱ्या आणि शिक्षण प्रसार-प्रचार करणाऱ्या पहिल्या महिला आहेत.

स्त्री शिक्षणासोबतच सावित्रीबाई फुले यांनी दलित, शूद्र-अतिशूद्र अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक शाळा सुरू केल्या. त्यांनी स्त्रियांसाठी, मागासवर्गीयांसाठी आणि दुर्लक्षित घटकांसाठी शिक्षणाची दारे उघडली. समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद, स्त्री-पुरुष विषमता यांना त्यांनी निर्भीडपणे विरोध केला. विधवाविवाह, पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध, अनाथ बालकांचे संगोपन अशा अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून मार्ग दाखवला.  जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद साऱ्याच भेदांचा चक्रव्यूह फोडून त्यांनी दीडशे वर्षापूर्वी सर्व धर्म,जात,पंथातील मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा केला.

सावित्रीबाई फुले या एक संवेदनशील कवयित्रीही होत्या. त्यांच्या कविता समाजप्रबोधन करणाऱ्या होत्या. ‘काव्यफुले’ आणि ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ व अन्य त्यांचे ग्रंथ सामाजिक परिवर्तनाचा संदेश देतात. त्यांच्या लेखनातून शिक्षणाचे महत्त्व, आत्मसन्मान, स्त्री स्वातंत्र्य आणि मानवतावाद यांचा आग्रह दिसून येतो.

सावित्रीबाई फुले यांनी तत्कालिन समाजव्यवस्थेच्या काही अंध रुढी परंपरा पाळल्या नाहीत.  त्यासाठी समाजाच्या रोषाला त्या बळी पडल्या. मात्र आज पासून दीडशे वर्षांपूर्वीचा त्यांचा संघर्ष महिलांसाठी आजही प्रेरणादायी आहेत.  त्यांना अपत्य नव्हते.  त्याकाळात अपत्य नसणारी माताही समाजाला सहन व्हायची नाही.  मात्र समाजाच्या नावे ठेवण्याची, टोमण्याची पर्वा न करता जैविक मूल नसताना त्यांनी एका विधवेच्या मुलाला दत्तक घेतले.  त्याचे संगोपन केले. त्याला पुढे डॉक्टर केले.  हा मुलगा देखील त्यांच्यापर्यंत एका क्रांतीकारी निर्णयातून पोहचला. ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी त्या काळात बालहत्या प्रतिबंधक गृह केंद्र सुरु केले.  शोषित विधवांच्या, असाह्य मातांना, कुमारी मातांना समाजात मरण यातना भोगाव्या लागणारा तो काळ. 

त्याकाळात या दांम्पत्यांनी हे बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केले.  या आश्रय गृहातील विधवेला झालेला ‘यशवंत’ हा त्यांनी पुढे दत्तक घेतला.  त्यामुळे स्वत:  निपुत्रिक असणे हे कोणतेही पाप नाही.  विधवांना संरक्षण देणे समाजविरोधी नाही.  मुलगा दत्तक घेणे ही एक आदर्श उपाययोजना आहे, असा वस्तूपाठ घालण्याचा निर्णय दीडशे वर्षापूर्वी घेतलेली सावित्री आजही आमच्या समाजाला प्रेरणादायी आहे.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या कार्यात सावित्रीबाई फुले यांचा सक्रिय सहभाग होता. समाजातील अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळावा, समतेवर आधारित समाजनिर्मिती व्हावी यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे कार्य पुढे चालू ठेवले.

१८९६-९७ साली पुण्यात प्लेगची भीषण साथ पसरली. त्या काळात समाजातील अनेक लोक आजारी लोकांपासून दूर पळत असताना सावित्रीबाई फुले यांनी मात्र प्लेगग्रस्त रुग्णांची सेवा करण्याचा कणखर निर्णय घेतला. त्यांनी स्वतः रुग्णांना खांद्यावर घेऊन रुग्णालयात दाखल केले. याच सेवाकार्यादरम्यान त्यांना प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. मानवतेच्या सेवेतील हे त्यांचे  शेवटचे पण अत्युच्च बलिदान ठरले.

सावित्रीबाई फुले यांचे जीवन हे संघर्ष, करुणा, धैर्य आणि परिवर्तनाचे प्रतीक आहे. त्यांनी स्त्रीला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, समाजाला विचार करायला शिकवले आणि समानतेचा मार्ग दाखवला. सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि कार्य आजही तितकेच समर्पक आणि प्रेरणादायी आहेत. शिक्षण, समानता आणि मानवता या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीसाठी त्यांचे जीवन प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरते.

सावित्रीबाई फुले थोडक्यात जीवनपट
पूर्ण नाव : सावित्रीबाई ज्योतिराव फुले
जन्मतारीख : ३ जानेवारी १८३१
जन्मगाव : नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, महाराष्ट्र
वडिलांचे नाव : खंडोजी नेवसे पाटील
पतीचे नाव : महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले

कार्य / योगदान : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, पुणे येथे पहिली मुलींची शाळा (१८४८) सुरू केली, स्त्री शिक्षण, दलित शिक्षण व शूद्र-अतिशूद्र समाजाच्या उन्नतीसाठी कार्य, बालहत्या प्रतिबंध, विधवाविवाह, स्त्री-पुरुष समानता यांसाठी समाजसुधारणा, सत्यशोधक समाजाच्या कार्यात सक्रिय सहभाग, प्लेग साथीच्या काळात रुग्णसेवा

मृत्यू : १० मार्च १८९७, पुणे, महाराष्ट्र (प्लेगग्रस्त रुग्णांची सेवा करताना संसर्गामुळे निधन)
ओळख : भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, 
थोर समाजसुधारिका, कवयित्री व शिक्षणतज्ज्ञ, 
महाराष्ट्र शासन व भारत सरकारकडून गौरविलेले व्यक्तिमत्त्व

लेखक…प्रवीण टाके , उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर, (मो.नं -9702858777)

of women's education Pioneer Savitribai Phule
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBecome digital : स्वतः डिजिटल व्हा आणि घरच्यांना डिजिटल साक्षरतेचे धडे द्या : राहुल पाटील
Next Article child marriage : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास विभागास बालविवाह रोखण्यात यश
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Health Camp Mahur : माहूर येथील आरोग्य शिबिराच्या उद्घाटनात शिवसेनेचा राडा

September 26, 2025

government portal : घरोघरीच्या व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची छायाचित्रे अपलोड करण्यास शासनाच्या पोर्टलची निर्मिती

August 30, 2025

Dharmabad railway station ; धर्माबाद रेल्वे स्टे.ला संघाचे संस्थापक डाॅ.हेडगेवारचे नांव देण्याची मागणी -डाॅ.एस.एस.जाधव -NNL

October 6, 2024

शासकीय विद्यानिकेतन, छत्रपती संभाजीनगर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध दोन दिवसिय स्नेहसंमेलन उत्सहात -NNL

June 11, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Free the locked statue of Chhatrapati Shivaji and erect it with dignity | छत्रपती शिवरायांचा बंदिस्त पुतळा मुक्त करून सन्मानाने उभारा; उमरखेड कडकडीत बंद – NNL

Local Crime Branch : चार अग्नीशस्त्र (पिस्टल) सह चार आरोपी ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही -NNL

अनुष्का सरपे हीच नीट परीक्षेत घवघवीत यश -NNL

Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ

all out operation in Nanded : नांदेड शहरात पोलीसांकडून ऑल आऊट ऑपरेशनमध्ये केलेली कामगिरी -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?