नांदेड| माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांचे सामाजिक आणि अध्यात्मिक कार्य कौतकास्पद असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार ह .भ. प. रोहिदास महाराज मस्के यांनी केले. सतीश देशमुख यांनी नांदेड उत्तर मध्ये संकल्प यात्रा सुरू केली असून श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी नांदेड येथील चैतन नगर शिवमंदिर (तरोडा बु) येथे अभिषेक करून संकल्प यात्रा सुरुवात करण्यात आली.


सुप्रसिद्ध कीर्तनकार ह .भ. प. रोहिदास महाराज मस्के यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कीर्तनासाठी आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, प्रशासकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. या निमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते. भाविकानी किर्तन व महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान १२ ऑगस्ट रोजी मरळक येथे संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा म्हणून ह भ प काशिनाथ महाराज माने यांचे कीर्तन प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. तरोडेकर यांच्या संकल्प यात्रेला शिवमंदिर येथून सुरुवात झाली असून ऑगस्ट महिन्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.


तिरंगा रॅली,जनसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. काल नांदेड येथे झालेल्या किर्तन महोत्सवास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यांच्या सामाजिक आणि अध्यात्मिक कार्याची योग्य वेळी समाज दखल घेईल असा विश्वास ह .भ. प. रोहिदास महाराज मस्के यांनी व्यक्त केला. यावेळी चैतन्यनगर शिवमंदिर समितीचे अध्यक्ष माधवराव पटने व नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांच्या हस्ते कीर्तनकार ह .भ. प. रोहिदास महाराज मस्के व महोत्सवाचे आयोजक सतीश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
