नांदेड | माजी उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर यांनी आयोजिलेल्या मरळक येथील किर्तन सोहळ्यास अलोट गर्दी झाली होती. मरळक येथे परिवर्तन संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा म्हणून ह भ प काशिनाथ महाराज माने यांचे कीर्तन आणि महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. मरळक येथे झालेल्या किर्तन महोत्सवास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.


श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी नांदेड येथील चैतन नगर शिवमंदिर (तरोडा बु) येथे अभिषेक करून परिवर्तन संकल्प यात्रा आरंभ करण्यात आली होती. ह भ प काशिनाथ महाराज माने यांनी समाज प्रबोधनवर आधारीत अंसख्य उदाहरणे देवून उपस्थित जनसमुदयास प्रेरणादायी संदेश देत किर्तनातून जनजागृती केली. माजी उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर यांच्या सामाजिक आणि अध्यात्मिक कार्याची पावती त्यांना नक्की मिळेल असा विश्वास ह .भ. प. काशिनाथ महाराज माने यांनी व्यक्त केला. यावेळी किर्तन व महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी घेतला.

