लोहा| लोहा पंचायत समिती मध्ये सतत दोन वर्षे प्रभारी बीडीओ ‘पद कार्यरत होते. त्यामूळे संपूर्ण प्रशासनाचा बट्ट्याबोळ झाला आहे. सरपंच, कारभारी व रोजगरसेवक याच्याच इशाऱ्यावर प्रशासन चालले (?) की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.


लोहा तालुक्यात ११८ ग्रामपंचायती असून ९६ ग्रामसेवक कार्यरत आहेत पण त्यापैकी १४ जणांना एकही गाव नाही. त्यामुळे त्यांच्या फटका मासिक पगाराला बसला. ग्रामसेवकांच्या अंतर्गत बदली आदेश नव्याने रुजू झालेल्या बीडीओ यांनीं काढले. पण लाडक्या ग्रामसेवकाना सरपंच सोडिनात आणि नव्यांना रुजू करून घेत्र नाहीत. या ढेपाळलेल्या ‘व्यवस्थेला” कायद्याचा चाप लावण्यासाठी बीडीओ श्री कुलकर्णी एक्शन मोडवर आहेत.

लोहा पंचायत समितीत गेली दोन वर्ष सरपंच, पॅनेल प्रमुख, रोजगार सेवक यांचीच चलती राहिली. त्यामूळे या पंचायत समितीच्या प्रशासनाला ‘भ्रष्टाचाराची’ वाळवी’ लागली आहे. दोन वर्षांच्या कामाची चौकशी व्हायला पाहिजे (?) पण होत नाही. तालुक्यातील ग्रामसेवकांची १०१ पदे मंजूर असून, ९६ ग्रामसेवक सध्या कार्यरत आहेत. यात ८२ ग्रामसेवकांना गावे दिली आहेत. त्यापैकी ३५ जणांना दोन तर काहींना तीन, चार गावे दिलेली आहेत. पण १४ ग्रामसेवक असे आहेत की, त्यांना गावे दिली नाहीत. काहीजण तर दोन वर्षा पासून विनंती पत्र देताहेत पण त्यांना गाव दिले जात नाही.


प्रभारी बिडीओमुळे प्रशासनाला मरगळ
पंचायत समितीमध्ये मागील दोन वर्षात कायम स्वरूपी बीडीओ नव्हते त्यामुळे सगळी सिस्टीम ढेपाळली आहे. “मग्राहयो ” योजनेत प्रचंड गैरप्रकार झाला आहे. त्याचा विधानसभा अर्थ संकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न झाला होता. केवळ “अर्थपूर्ण” कामांना प्राधान्य दिले गेले. त्यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळाचे अंकेशन (चावडी वाचन) झाले तर बराच घोटाळा बाहेर येईल(?) अशी चर्चा याच कार्यालय परिसरात ऐकायला मिळते.

सरपंचांना पाहिजेत “लाडका’ ग्रामसेवक
बिडीओ यांनी तालुका अंतर्गत ग्रामसेवकांच्या बदल्या केल्या पण त्या त्या गावचे सरपंच त्या ग्रामसेवकांना रुजू करून घेईनात. त्यांना ओळखीचे, ऐकणारे आणि नियमांना बगल देणारे ग्रामसेवक हवे असतात. त्याच्या पूर्व संमती शिवाय जर गावाचा ग्रामसेवक बदलला तर बदलून येणाऱ्यांना रुजू करून घेतले जात नाही. पूर्वीचे ग्रामसेवक चार्ज देत नाहीत पण कायमस्वरूपी बीडीओ श्री कुलकर्णी एक्शन मोडवर आहेत. ग्रामीण विकासाच्या या ढेपाळलेल्या परिस्थितीत सुधारणा आणण्याचा त्याचा प्रयत्न दिसतो आहे.
१४ जणांना अद्याप गाव नाही
११८ ग्रामपंचायत आहेत त्याचा ८२ ग्रामसेवकाकडे कारभार आहे. पण १४ ग्रामसेवकांना अद्याप ही गाव मिळाले नाही. ३१ जणांकडे ‘दोन-तीन गावे आहेत गावचा कारभारी( पॅनल प्रमुख ) सरपंच याना आपल्या मर्जीतील लाडका ग्रामसेवक पाहिजे असतो. त्यामुळे ग्रामपंचायत सुद्धा भ्रष्टाचाराचे “कुरण” बनले आहे.

