Principal Kishanrao Dafde as Chairman Co-operative Purchase and Sales Union | कंधार तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या प्रशासकिय चेअरमनपदी प्राचार्य किशनराव डफडे यांची नियुक्ती – NNL

कंधार, सचिन मोरे| कंधार तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या प्रशासकीय शासन नियुक्त चेअरमनपदी माजी प्राचार्य व भारतीय जनता पक्षाचे कंधार तालुका अध्यक्ष किशनराव डफडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


जवळपास गेल्या आठरा वर्षापासून बंद असलेली अवसायन असलेली संस्था १९ जुलै २०२४ ला शासन नियुक्ती प्रशासकीय चेअरमन म्हणून भाजपाचे कंधार तालुका अध्यक्ष व माजी प्राचार्य किशनराव डफडे यांची नियुक्ती करण्ययात आली आहे. ही बंद पडलेली संस्था पुर्नरजिवीत करण्यासाठी राज्याचे मुख्यमंञी एकनाथराव शिंदे, व उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस, उपमुख्यमंञी अजितदादा पवार व सहकारमंञी अब्दुल सत्तार व नांदेड जिल्ह्याचे लोकनेते माजी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर व भाजपाच्या महिला प्रदेश अध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर आणि भाजपा नांदेड जिल्हा सरचिटनिस प्रविण पाटील चिखलीकर याच्या प्रयत्नांने संस्था पुर्नजिवत करण्यात आली.

कंधार तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ ही संस्था पुर्नजिवित करण्याससाठी यांनी मोठे प्रयत्न केले आहेत. १९७० ते १९९० पर्यंत ही संस्था भरभराटीत होती. पण शासनाच्या धोरनानुसार सर्व व्यवहार बंद पडल्यामुळे हा खरेदी विक्री संघ गेल्या गेल्या आठरा वर्षा पासून बंद होता. नांदेड जिल्ह्याचे लोकनेते माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर या राज्याचे मुख्यमंञी व दोन्ही उपमुख्यमंञी आणि सहकार मंञी यांच्याकडे पाठपुरावा करून ही संस्था पुर्नजिवीत करण्यात आली आहे. आणि या संस्थेच्या प्रशासकिय चेअरमन पदी अनुभवी व विद्याविभुषित असलेले माजी प्राचार्य व भाजपाचे कंधार तालुका अध्यक्ष किशनराव डफडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून अण्णासाहेब गोविंदराव कदम, दताञ्य गंगाराम चंदनफुले, व्यंकटराव गणपतराव कदम, केशव मनोहरराव वडगावे, राजीव बालाजी मुपनर ,शिवाजी गंगाधर चक्रधर, खुशाल आनंदराव राजे, माणिकराव माधवराव शिंदे, बसलिंग बापुराव भुरे ,धनराज बाजीराव लुंगारे, कालीदास व्यंकटराव गंगावारे, बालाजी शंकर पवळे, सौ. शोभाबाई दताञ्य घोरबांड ,सौ.भागीरथबाई केशवराव तेलंग यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


प्राचार्य किशनराव डफडे यांची प्रशासकिय चेअरमनपदी नियुक्ती झाल्या बद्दल कधार तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे माजी मॅनेजर व सध्याचे अवसायक बी.आर बनसोडे फुलवळकर यांनी चेअरमन व सर्व सदस्यांचा पूष्षहार घालुन स्वागत केले यावेळी भाजपाचे कंधार तालुका सचिव मधु पाटील डांगे, लक्ष्मुनराव गायकवाड, बालाजी डफडे, प्रभु कांबळे,प्रभाकर केंद्रे, प्रदिप मंगनाळे,व्ही बी वर्ताळे, किशनराव गित्ते, भाऊराव कांबळे याची प्रमुख उपस्थिती होती. चेअरमन पदी निवड झाल्या बद्दल लोकनेते माजी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी जि.प.सदस्या प्रणिताताई देवरे चिखललीकर ,माजी जि.प.सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, सचिन पाटील चिखलीकर, भाजपा तालुका सचिव मधु पाटील डांगे, सरपंच कैलास पाटील नवघरे, श्यामसुंदर शिंदे मांजरमकर, माजी नगरसेवक सतीश कांबळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे




