भक्तीचे काजळ घालुन ज्या संतानी परमेश्वराला पाहिले अशा सर्व संताना मी बारंबार प्रणाम करते परमेश्वराचे दिव्यत्व काय आहे हे फक्त संतच समजु शकतात. आपली भारत भुमी पावन शुमी झाली या संतानमुळेच अशा सर्व संताना मी बारंबार प्रणाम करते. संताच्या साधनेमुळे आणि त्यांनी केलेल्या भगवंताच्या किर्तनामुळे आज या सृष्टीचा आणि आपल्या समाजाचा समतोल राखला गेला हे आशा थोर महान आणि दिव्य संताना मी बारंबार प्रणाम करते.


साधारण मानवला अंधाराकडून प्रकाशाकडे घेवून बावरे हसंत रुप खुप श्रेष्ट आहेत अशा संताची भगवंत पुजा करतात. अशा सर्व श्रेष्ट संताना मी बारंबार प्रणाम करते. अध्यात्माचे ज्ञान सत्संगाचे महत्व वाणीतून आणि कर्मातून फक्त आणि फक्त संतच समजावू शकतात. अशा सर्व संताना मी बारंबार प्रणाम करते. भागवत, रामायण, आणि गीता हे सर्व श्रेष्ठ ग्रंथ संतानी लिहिले आणि समाजाला समाजवले अशा सर्व संताना मी बारंबार प्रणाम करते. परमेश्वर काय आहे हे फक्त या श्रेष्ठ संतानी जाणले आणि तो परमेश्वर या मानवाला माहिती करून दिशा दाखविल्या अशा या श्रेष्ठ संताना मी बारंबार प्रणाम करते.


गर्व दिवा साधारण मानवाली ज्ञान देऊन शक्ती मार्गाला लावणे वृक्ष वल्ली डोंगर नद्या या सर्वांचे महत्व मानवाला सांगून त्यांचा आदर करण्याचे शिकवले अशा संताला मी बारंबार प्रणाम करते. आपल्याला खुप अभिमान आणि गर्व असावा कि आपण अशा पवित्र पावन संताच्या भारत सुमीत जन्माला आलो आहोत. अशा या संतांच्या भूमीला मी बारंबार प्रणाम करत आहे. ‘भ’ म्हणजे भाव भक्ती… र’ म्हणजे राग… त’ म्हणजे ताल… जिथे भाव आहे ताल आहे राग आहे अशी भुमी म्हणजे भारत भुमी. टाळ मृदंग विना आणि चिपळ्यांच्या नादामुळे हि सृष्टी डोलते अप्सरा नृत्य करतात आणि देवता प्रसन्न होतात. हिरवा आनंदाचा शालु घालुन सृष्टी या महान संताच्या दर्शनाला येते अशा सर्व संताना मी बारंबार कोटि कोटि प्रणाम करते.

संताविन नाहि मिळत देव….
नाहि मिळत मोक्ष….
तू कर रे मानवा सत्संग….
जय जय राम कृष्ण हरि…..
जय जय राम कृष्ण हरि….
जय जय राम कृष्ण हरि….
……लेखक ….वर्षा जमदाडे, नांदेड
