
नांदेड। सांगली येथे पार पडलेल्या डिजीटल मिडीया अधिवेशनात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राज्य निवड समिती अध्यक्षपदी नांदेडचे जिल्हा सरचिटणीस तथा दै.समीक्षाचे मुख्य संपादक रुपेश पाडमुख यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र संस्थापक तथा राज्य संघटक संजय भोकरे, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे व प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव अरोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या डिजीटल मिडीयाचे प्रथम अधिवेशन निर्णायक व दिशादर्शक नेतृत्व सिध्दार्थ भैय्या भोकरे यांच्या संकल्पनेतून संपन्न झाले. सदरील अधिवेशनात पदाधिकार्यांच्या बैठकीत रुपेश पाडमुख यांची राज्य निवड समितीच्या नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. राज्यात पदाधिकार्यांच्या निवडीवर वाद किंवा समस्या निर्माण होतात. वास्तवीक संघटनेच्या रचनेनुसार तालुकाध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांकडे, त्यांनी विभागीय अध्यक्षांकडे व त्यांनी शेवटी प्रदेशाध्यक्षांकडे म्हणणे, तक्रार व काही समस्या सांगणे क्रमप्राप्त आहे. पदाधिकार्यांनी स्वंयशिस्त लावून आपल्या पदाची आचारसंहिता पाळत पारदर्शकता निर्माण व्हावी व निवड समितीच्या स्तरावर प्रश्न सोडवल्या जावेत म्हणून ही निवड करण्यात आली आहे.

प्रत्येकांनी निवड समितीच्या राज्य अध्यक्षांकडे समस्या मांडाव्यात त्यांच्या स्तरावर सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि शेवटी त्यांनी प्रदेश सरचिटणीस डॉ.अरोटे यांच्याकडे वर्ग करावा. त्यांच्या स्तरावर ते समजून सांगून शेवटी राज्य संघटक व प्रदेशाध्यक्षांकडे सर्व परिस्थिती मांडू शकतात. संघटनेतील प्रत्येक स्तरावर आपले अधिकार वापरतांना कर्तव्याची जाणीव ठेऊन कुणीही कुणाच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचे टाळणे अपेक्षीत आहे.
संघटनेचे संस्थापक तथा राज्य संघटक संजय भोकरे, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, प्रदेशाध्यक्ष डॉ.विश्वासराव अरोटे यांनीही निवड करुन मोठी जबाबदारी पाडमुख यांच्यावर टाकली आहे.


यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा लातूर जिल्हाध्यक्ष अशोक डेडे, राज्य प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव, मंत्रालयीन पत्रकारसंघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी अध्यक्ष खंडूराज गायकवाड, संजय बोपेगावकर, संघटनेचे ब्रँड अॅम्बेससॅडर, संजय फुलसुंदर यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. संपादक रुपेश पाडमुख यांची निवड समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

संधी दिल्याबद्दल आभार-रुपेश पाडमुख
संघटनेेचे संस्थापक तथा राज्य संघटक संजय भोकरे व प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांनी राज्यातील पदाधिकार्यांच्या निवडीच्या समस्या त्यांच्या स्तरावर सोडवण्यासाठी आणि संघटनात्मक वाढीसाठी दिलेली ही मोठी जबाबदारी आहे. त्यांनी टाकलेल्या विश्वासाबद्दल व दिलेल्या संधीचे सोने करणार असल्याचे प्रतिपादन नुतन प्रदेशाध्यक्ष रुपेश पाडमुख यांनी करत त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.



