हदगाव | हदगाव शहरातील नगरपरिषदेच्या विविध प्रभागां मध्ये,न.पा प्रशासन आणि सा. बां. हदगांव विभागाने केलेल्या रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्या प्रभागांमध्ये या कामांची आवश्यकता होती, तिथे न करता, अनावश्यक ठिकाणी कोणतेही नियोजन न करता केवळ कंत्राटदारांचा फायदा कसा होईल यावर भर देण्यात आला आहे.हदगाव शहरातील अनेक सिमेंट रस्ते काही आठवड्यांतच उखडले, तर काही रस्ते अवघ्या सहा महिन्यांतच खराब झाले. या मुद्द्यावर शहरवासियां सह विविध आणि सामाजिक संघटनांनी जोरदार आवाज उठवला आहे. तरी सुद्धा नगरपरिषद प्रशासन याकडे “आर्थिक” स्वार्थातून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. या दुर्लक्षित भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


‘सावधान’ बॅनरद्वारे नागरिकांचा संताप नगरपरिषदेच्या दुर्लक्षाने त्रस्त झालेल्या काही जागरूक नागरिकांनी शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘सावधान’ असे बॅनर लावून एक प्रकारची सूचना दिली आहे “वाहने सावधगिरीने चालवा, रस्ता नवा आहे, धुळीचा त्रास होईल. ज्यांनी पूर्वी हा रस्ता केला, ते अभिमानाने सांगत होते की त्यांनी मंजुरी मिळवली. पण आता तसे सांगण्याची हिंमत का होत नाही…नागरिकांनी व्यक्त केलेला हा संताप राजकीय दृष्टिकोनातून गंभीर मानला जात आहे…
!.विद्यमान आमदारांनी लक्ष द्यायला हवे…!

हदगाव शहरातील कोणत्याही रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार झालेले नाही. त्यामुळे अशा कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये असे अनेक रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले आहेत.नवीन रुजू झालेले मुख्याधिकारी यांनी या सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी करावी. जर कोणत्याही रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आढळले, तर संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करावे आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे.लाखो-कोटी रुपयांच्या निधीतून तयार होणाऱ्या रस्त्यांची कामे वर्क ऑर्डरप्रमाणे झालेली नाहीत. तसेच शासनाच्या आदेशानुसार या रस्त्यांवर कुठेही कामाच्या तपशीलासह फलक लावण्यात आलेले नाहीत. यावरून हे स्पष्ट होते की, काम कशा प्रकारे पार पडले आहे…
